स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाचे आयोजन
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या हतनूर धरणावर ‘हर घर तिरंगा’ जनजागृती पंधरवड्यानिमित्त खास रोषणाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार, हे धरण २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तिरंग्याच्या रंगांच्या प्रकाशात उजळून निघणार आहे.
देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय ध्वजाचा गौरव करण्यासाठी ही रोषणाई करण्यात आली आहे. या मनमोहक दृश्यामुळे परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने धरणाला भेट देत आहेत. निसर्गप्रेमींनी या सुंदर दृश्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.