२५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात ; सर्व विषय सर्वानुमते मंजूर
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा डॉ. उल्हास पाटील यांनी केली.
गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक लि.,बँकेची पंचविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी १० रोजी सकाळी ९.३० वाजता सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन, पार पडली. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील हे होते. व्हा.चेअरमन श्री. सोनु गोमा भंगाळे व संचालक मंडळ सदस्य सुभाष पाटील, सुरेश झोपे, शालीग्राम चौधरी, सुनिल महाले, डॉ. चंद्रसिंग पवार, डॉ. संपत वानखेडे, हरिष फालक, राजेंद्र कुरकुरे, राजेंद्र महाजन, चंद्रकुमार चौधरी, लिलाधर चौधरी, यमुनाबाई महाजन व व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन उपस्थित होते. सभेत नऊ विषय सर्वानुमते मंजुर झाले. यंदाही बँकेचा एन.पी. ए ० टक्के आहे. त्यामुळे सभासदांना लाभांश जाहीर करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा सहकार बोर्डातर्फे सभासदांना प्रशिक्षण डी. आर. पाटील यांनी दिले. सूत्रसंचालन अशोक महाजन यांनी तर आभार सुरेश झोपे यांनी मानले.