भुसावळ शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशनची कारवाई
केवल अनिल टाक (वय ३०) आणि शिवा जगदीश पथरोड (वय ३०, दोघे रा. भुसावळ) हे दोघे गोकुळ टी परिसरात अवैधरीत्या तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या जवळील एक लोखंडी तलवार जप्त केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत सोनार करीत आहेत.