एमआयडीसी पोलीसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जगवानी नगरातील गेटसमोरील दुकानाचे शटर वाकवून १ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे जुने व नवे तांब्याची तार चोरून नेल्याची घटना दि. १६ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या तिसऱ्या अट्टल चोरट्याला वाघ नगर परिसरातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.
शिकवणसिंग बरियामसिंग उर्फ पटमलसिंग टाक (वय ३६,रा. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दि. १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगावातील एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगरच्या गेटसमोरील दुकान चे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ८५ हजार रुपये किमतीचे जुने व नवे तांब्याचे तार चोरले होते. याप्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउपनि राहुल तायडे, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना प्रदीप चौधरी, पोकॉ निलेश पाटील अशांचे पथक नेमले होते.
या पथकाने दि. २ मे २०२५ रोजी दोन आरोपींना अटक केली होती. मात्र, शिकवणसिंग बरियामसिंग उर्फ पटमलसिंग टाक हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तिसरा आरोपी हा वाघनगर परिसरात हा फिरत असल्याची गुप्त माहिती सफौ विजयसिंग पाटील आणि पोना प्रदीप चौधरी यांना मिळाली. तात्काळ त्याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २७ हजार रूपये किंमतीचे ५० किलो तांबे जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि राहुल तायडे आणि पोकॉ निलेश पाटील हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.