पारोळा तालुक्यातील ढोली शिवारातील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बोळे येथील २० वर्षीय तरुण हा गुरे चारण्यासाठी ढोली शिवारात गेला असता त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.५ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा ‘पोलीस ठाण्यात भाऊसाहेब महादु पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दि.५ आगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोनल रविंद्र पाटील (वय २०) हा बोळे व ढोली शिवारात आपले गुरे चारण्यासाठी गेला होता. त्याची एक म्हैस पाण्यात उतरल्याने व बाहेर येत नसल्याने तो तिला हाकलण्यासाठी काठावर गेला असता त्याचा पांझर तलाव क्र.२ ढोली शिवारातील निमदाळी धरणातील पाण्यात पाय घसरुन पाण्यात पडून बुडून मृत्यू पावला.
त्यास ढोली गावचे पोलीस पाटील पंकज पाटील, नारायण दासभाऊ गिरासे, वाल्मीक साहेबराव कोळी, आनंद भिल, भोला कोळी व गावातील इतर लोक अशांनी धरणातील पाण्यात पडलेल्या सोनलला धरणात उतरुन बाहेर काढले. त्यानंतर त्यास खाजगी वाहनात टाकुन उपचाराकामी कुटीर रुग्णालय, पारोळा येथे सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दाखल केले. डॉक्टर यांनी तपासुन मयत घोषीत केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर सोनवणे करीत आहे.