सामाजिक संस्थेचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी रक्षाबंधन सणानिमित्त महिला भगिनींतर्फे राखी पाठवण्यात आल्या. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे या राख्या सुपूर्द करण्यात आल्या.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विचार वारसा फाउंडेशनने हा अनोखा उपक्रम राबवला आहे. रक्षाबंधन सणानिमित्ताने आपल्या देशाच्या सीमेवर रक्षणासाठी तैनात असणाऱ्या सर्व सैनिक बांधवांना मेहरूण परिसरातील सप्तशृंगी नगर, एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, महाजन नगर, नागसेन नगर, एमडीएस कॉलनी आदी परिसरातील महिला भाविकांनी या राख्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. यावेळी संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.