जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कालिंका माता मंदीराजवळ लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून लाकडी दांडकाने वृध्द महिलेसह त्यांचा मुलगा आणि सून यांना शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याबाबत रविवारी ३ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताराबाई सुकलाल शिंदे (वय ६० रा. कालिंका माता मंदीर, जळगाव) ह्या महिला मुलगा एकनाथ शिंदे, सुन सुनिता शिंदे यांच्यासह वास्तव्याला आहेत. शनिवारी २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून वाद निर्माण झाला. या वादातून शेजारी राहणारे सुनिता आवल्या शिंदे, विजू पिंटू शिंदे, अमोल सुकलाल साळुंखे आणि देविदास लाला सोळुंखे (सर्व रा. कालिंका माता मंदीरजवळ, जळगाव) यांनी वृध्द महिलेला व त्यांच्या मुलगा आणि सुन यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केले.
तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वृध्द महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे सुनिता आवल्या शिंदे, विजू पिंटू शिंदे, अमोल सुकलाल साळुंखे आणि देविदास लाला सोळुंखे सर्व रा. कालिंका माता मंदीरजवळ, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.