अमळनेर शहरात ५ वर्षांपूर्वी घडली होती घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- येथील होमगार्डला शासकीय कर्तव्यावर असताना मारहाण करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने तीन महिन्यांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. ईस्माईल जब्बार पठाण ऊर्फ ईस्माईल खड्डा (२९, पाणखिडकी, अमळनेर) असे दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना २०२०मध्ये अमळनेर येथील सुभाष चौकात घडली होती. दिलीप मराठे हे शासकीय वाहन नियंत्रण करत असताना आरोपीने त्यांना अडवून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात कलम ३५३, ३३२, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीस कलम ३५३ नुसार तीन महिने सक्तमजुरी व १००० रुपये दंड, तर कलम ३३२ नुसार तीन महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील अॅड. बागूल यांचे सहकार्य लाभले.