जळगाव शहरात एमआयडीसी भागात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील श्री आनंद बॅटरी बनवणाऱ्या कंपनीतून ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना १ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एमआयडीसीतील ई-सेक्टरमध्ये लखन वासुदेव बधानी (वय ४९, रा. गणपती नगर) यांची श्री आनंद बॅटरी नावाची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये बॅटरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ठेवले जाते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ३१ जुलै ते १ ऑगस्ट रोजी दरम्यान कंपनीतून ९७ हजार रुपये किमतीचे कच्चे साहित्य चोरून नेले. ही घटना शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उद्योजक लखन बधानी यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, रात्री आठ वाजता अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद लाडवंजारी करत आहेत.