जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस दलातील १३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत (एलसीबी) नेमणुका करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीमध्ये प्रशासकीय सोयीनुसार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या निकडीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मागील महिन्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी नवीन नियुक्ती प्रलंबित होती. अखेर महिन्याभराने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी १३ कर्मचाऱ्यांची त्याठिकाणी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे त्यात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.(केसीएन)नेमणूक झालेल्या १३ कर्मचाऱ्यांमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशन येथून प्रशांत रमेश परदेशी, राहुल चंद्रकांत रगडे, विकास मारोती सातदिवे, छगन जनार्दन तायडे, रतन हरी गिते, डीवायएसपी कार्यालय भुसावळ येथील उमाकांत पन्नालाल पाटील, भुसावळ बाजारपेठ येथील राहुल विनायक वानखेडे, निंभोरा येथील मयूर शरद निकम, रावेर येथून सचिन रघुनाथ घुगे, वरणगाव येथून प्रेमचंद वसंत सपकाळे, जिल्हापेठ स्टेशनमधून सलीम सुभान तडवी, मुख्यालय जळगाव येथून गोपाल उखडू पाटील, चोपडा ग्रामीण येथून रावसाहेब एकनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.