यावल तालुक्यात हिंगोणा गावाजवळ घटना
यावल ( प्रतिनिधी ) – अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत हंबर्डी येथील मेकॅनिकचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता हिंगोणा परिसरातील मोर कॉलनी जवळ घडली. हाय स्कूल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचे नाव योगेश्वर उर्फ गणेश नेमाडे असे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील असा परिवार आहे. यावल येथून आपले काम आटोपून ते दुचाकीने (क्रमांक. एम. एच. १९, बी. इ. ८६०९) यावलहून हंबर्डीला परतत होते. यावआला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हंबर्डी परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.