नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोची, जबरदस्तीने पत्नीला दारू पाजून मुलासमोरच तिच्यावर मित्रांसह सामुहिक बलात्कार करण्याची संतापजनक घटना केरळमध्ये घडली. या घटनेतील पतीसह त्याच्या चारही मित्रांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या लहान मुलालाही बेदम मारहाण करण्यात आली. त्याबाबत केरळ राज्य महिला आयोगाने स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. या महिलेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. तिच्या पतीने दोन मुलांसह तिला पुथुकुरीच्या येथील समुद्र किनाऱ्यावर नेले. तेथून त्या बिच जवळ असलेल्या मित्राच्या घरी नेले. तेथे तिला बळजबरी दारू पाजली. त्यानंतर मुलासमोर पतीने आणि त्याच्या चार मित्रांनी बलात्कार केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
ही महिला असहाय्य अवस्थेत रस्त्यावर फिरत असताना एक तरूणाने तिची सुटका केली. तिला मोटारीतून तिच्या घरी सोडले. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. याबाबत खातरजमा केल्यानंतर कडिनमकुलम पोलिसांनी पाचही जणांना अटक केली.
या महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर तिला दवाखान्यात दाखल केले. उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. त्या महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या, असे तिला मदत करणाऱ्या तरूणाने अनेक वृत्त वाहिन्यांना सांगितले.








