अमळनेर पोलीस स्टेशनचा तपास
अमळनेर ( प्रतिनिधी ) : – पारोळा तालुक्यातील सुमठाणे व अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारात महिलांच्या घडलेल्या दोन निघृण खुनांचा उलगडा झाला आहे. या दोन्ही खुनांचा सूत्रधार अनिल गोविंदा संदानशिव (रा. सुमठाणे, ता. अमळनेर) हाच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे.
पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथील रहिवासी शोभाबाई कोळी व सुरत येथील वैजयंताबाई भोई या दोन्हींच्या खुनांची संशयिताने कबुली अमळनेर पोलिसांकडे दिली आहे. (केसीएन)शोभाबाई रघुनाथ कोळी (४८, रा. उंदिरखेडा, ता. पारोळा) या घरकाम करणाऱ्या महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. ही घटना २५ जून रोजी सुमठाणे (ता. पारोळा) शिवारात उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनिल संदानशिव याला अटक केली होती. त्याच्याविरोधात पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शोभाबाई कोळी हिच्या खुनानंतर महिनाभराने २३ जुलै रोजी सुमठाणेपासून ८०० मीटर अंतरावर असलेल्या जानवे (ता. अमळनेर) परिसरात पोलिसांना एका महिलेचे आधार कार्ड, चप्पल, इतर साहित्य, कवटी आणि हाडांचे अवशेष आढळून आले.
अमळनेरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन्ही खुनांमधील साम्य लक्षात घेऊन तपास सुरू केला. या महिलेचे नाव वैजयंताबाई भगवान भोई (५०, रा. सूरत) असे असल्याचे समोर आले. वैजयंताबाई भोई या फरकांडे ता. एरंडोल येथील मूळ रहिवासी आहेत. दिनांक २ मे रोजी त्या सुरतहून आपल्या गावी आल्या होत्या.(केसीएन)वैजयंताबाई व अनिल यांची सूरत येथूनच ओळख झाली. त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार सुरत पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती
वैजयंताबाईचा खून ५ जुलै रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. अनिल संदानशिव आणि त्यांची सुरतला ओळख होती. ते दोघे एकत्र अमळनेरकडे परतले होते. त्यानंतर अनिलने वैजयंताबाईला जानवे जंगलात नेऊन तिचा निघृण खून केल्याची कबुली दिली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.