सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने उपक्रम
शिरसोली ( वार्ताहर ) – येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज सामाजिक वनीकरण विभाग ,जळगाव व राष्ट्रीय हरित सेना यांच्यातर्फे “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सुमारे ३०० विविध प्रकारच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते. प्रमुख अतिथी सामाजिक वनिकरण विभागाचे वनरक्षक संभाजी पाटील, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, हरित सेना प्रमुख चंद्रकांत कुमावत, दीपक कुलकर्णी, मनीषा पायघन हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या घरी आपल्या आईच्या हस्ते झाड लावून त्याच्या संगोपन करण्याचे वचन घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत कुमावत यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक कुलकर्णी यांनी केले. सुनील भदाणे यांनी वृक्ष संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे आभार मनीषा पायघन यांनी मानले.