चाळीसगाव शहरातील नवलेवाडी परिसरातील घटना

रामकृष्ण नगरातील नवलेवाडी येथील वृद्ध महिला शोभा सीताराम देवरे (वय ६५) सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेल्या असता याच वेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व स्वतःला पोलीस असल्याचे सांगून. “तुमचे दागिने सुरक्षित नाहीत, तत्काळ काढून पेपरमध्ये गुंडाळा,” असे सांगितले. यानंतर या महिलेने दागिने आरोपींच्या ताब्यात काढून दिले. त्यानंतर एका पेपरमध्ये गुंडाळून पुन्हा त्यांच्या हातात दिले व आरोपी तेथून पसार झाले. पुढे येवून महिलेने साडीचा गुंडाळा पाहिला असता त्यात दगड निघाले.
वृद्धेच्या लक्षात आले की, तिची फसवणूक झाली. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.









