पारोळा तालुक्यातील घटना, पोटदुखीच्या तपासणीवेळी घटना उघड
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर एका मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोटदुखीच्या कारणास्तव सरकारी रुग्णालयात गेले असता अत्याचारातून ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार समोर येताच तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी ‘सोनू’ नावाच्या मुलावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी पालकांसोबत राहते. गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.(केसीएन)तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.यावेळी पालकांना मोठा धक्का बसला. तर मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारले असता तिने माहिती दिली. पीडित मुलगी व तिची मैत्रीण हि बसस्थानकावर शाळा सुटल्यावर जायचे. तेथे दि. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत, पीडित मुलगी पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना, तिची पारोळा बसस्थानकावर ‘सोनू’ नावाच्या एका मुलासोबत ओळख झाली.
या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून हॉटेलमध्ये अनेकवेळा नेले आणि तिथे तिच्यावर एका खोलीत बलात्कार केला.(केसीएन) या बलात्कारातूनच मुलगी गर्भवती राहिल्याचे दिसून आले. या गंभीर घटनेने हादरलेल्या पीडित मुलीच्या आईने तात्काळ पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, ‘सोनू’ (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन हे करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.









