जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांची माहिती

पात्र विद्यार्थ्यांपैकी ९८% विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणवेश देण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होताना लाभार्थी संख्या थोडी कमी भासली असली, तरी संख्येत हळूहळू स्थिरता येत असून तालुकास्तरावर समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया २५ जुलै तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, लवकरच १००% वितरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.असे प्रभारी शिक्षण अधिकारी सचिन परदेशी यांनी कळविले आहे.









