पाचोऱ्यात जनसेवक बंडू सोनार यांना जनतेची मिळतेय साथ
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील नवजीवन विद्यालयाजवळ, तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी संकुलच्या मागे वसलेले इच्छापूर्ती दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने, एक संकल्प महाआरती पार पडली. जनसेवक बंडू सोनार यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाचे तिकीट मिळावं आणि प्रचंड मतांनी ते विजयी व्हावेत, हा संकल्प नागरिकांनी हनुमंतरायाच्या चरणी अर्पण केला.
ही आरती बंडू सोनार यांच्या हस्ते संपन्न झाली. बंडूभाऊ यांच्याकडे कोणतेही पद नाही, कोणतीही राजकीय लालसा नाही. तरी देखील, ते आजवर निःस्वार्थपणे अहोरात्र लोकसेवेत गुंतले आहेत. रुग्णसेवा, गरजूंची मदत, नागरी समस्या असोत किंवा सामाजिक कार्य, कुठेही ते मागे राहत नाहीत. यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. जय श्रीराम, जय हनुमान ! च्या गजरात वातावरण भारलेलं होतं. संकल्प आरतीत अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. गोपाल बन्सी लोहार, प्रशांत पाटील, अशिष लोहाटी, भाऊळ चौधरी, बापू चौधरी, शुभम शिंदे, उदय महाराज, लकी कळमकर, राज सोमवंशी आणि हनुमानाचे सर्व भक्तगण उपस्थित होते.