जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथे एक अभ्यासपूर्ण सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन सुरक्षा यावर जनजागृती करण्यात आली.
विशेष प्रमुख पाहुणे तुषार परदेशी,प्राचार्या अनघा पाटील यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करतांना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर,ऑनलाइन वैयक्तिक डेटांचे संरक्षण,सायबर धोके ओळखणे आणि टाळणे,मजबूत पासवर्ड आणि डिजिटल स्वच्छता यांचे महत्त्व विषद करून सांगितले. ज्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सुरक्षित आणि जबाबदारीने मार्गक्रमण करण्यासाठी आवश्यक असलेली जागरूकता आणि कौशल्य मिळाले.