प्रलंबित बदल्यांविरोधात कामगार महासंघ होता आक्रमक
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने, कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर ०८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू केले होते. तर २ कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला होता. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्त्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यावर दोघांनी अधिकाऱ्यांच्या हातून लस्सी पाजून उपोषण सोडले.
मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५% बदल्या करण्याचे आदेश असताना आणि बदल्यांसाठीची टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या नसल्यामुळे कामगारांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. उपोषणाला कामगार संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. मात्र मंगळवारी रात्री उपोषणाच्या स्थळी जळगाव मंडळाचे महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी जळगाव विभागीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी आले असता उपोषणस्थळी भेट दिली. त्याप्रसंगी जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह चर्चा करून त्यांच्या मागण्याचा सकारात्मक चर्चा केली. मागणी मान्य करून उपोषण करणाऱ्या विकी पाटील व सुदर्शन सपकाळे यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यामुळे आनंदाचे वातावरण तयार होऊन संघटनेतर्फे प्रशासनाचे आभार मानण्यात आले.









