जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथील ३७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल परशूराम पाटील (वय ३७ रा. कुसुंबा ता.जि.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. विशाल पाटील हा कुटुंबियांसह राहत होता. सोमवारी ७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.(केसीएन)ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचे नातेवाईक राहूल पाटील यांच्यासह शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या आत्महत्येमुळे कुसुंबा गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी हे करीत आहे.