विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचा जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर पालखी आणि वृक्षदिंडीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या भक्तिमय सोहळ्यामुळे विद्यालयाचा परिसर भक्ती आणि पर्यावरणाच्या संदेशाने भारून गेला होता.
या दिंडी सोहळ्यात लेझीम पथकाने विशेष रंगत आणली. तर पर्यावरणविषयक घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सर्वत्र भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. दिंडीचा समारोप झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व आणि सांस्कृतिक परंपरांचे ज्ञान मिळाले.पालखीचे पूजन संस्थेचे संचालक विलास सांगोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष सांगोरे, संचालक भूषण सांगोरे, मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक निखिल जोगी, पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, सांस्कृतिक विभाग प्रमुख अजय पाटील, पंकज सूर्यवंशी, लक्ष्मीकांत महाजन, प्रवीण पाटील, योगेंद्र पवार, अमृत पाटील, सुनील पाटील, संतोष चौधरी, राहुल देशमुख, सुनील साळवे, विजय पवार, भास्कर कोळी, मंगला सपकाळे, कल्पना देवरे, उज्वला गोहिल, करुणा महाले, सुनीता येवले, सुनीता साळुंके, लिखिता सोनवणे, माया खैरनार, सोनल मोरे, निलेश देसले, चेतन शिरसाट यांच्यासह सर्व विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.