जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ . उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषि दिनानिमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी .आर सपकाळे, डॉ. ललित जावळे, प्रा. संदीप पाऊलझगडे, पंकज मोरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नामदेव डी. पाटील तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. डॉ. ललित जावळे यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित विद्यार्थ्यांना कृषि दिनाचे महत्व समजावून सांगितले. त्याचबरोबर राज्यातील हरित क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याची सर्व उपस्थितांना आठवण करून दिली. तर अध्यक्षीय भाषणा मध्ये डॉ .पी. आर. सपकाळे यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण या कार्यक्रमाचे कौतिक करून अशाच समाजउपयोगी कार्यक्रमासाठी पुढील काळात आपण सोबत काम करू अशी ग्वाही दिली. त्यानंतर स्वयंसेवक जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.