नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – ज्येष्ठ नाट्य कलावंत शरद पोंक्षे यांच्या गाडीची काच अज्ञात व्यक्तीने फोडली. 100 वे नाट्य संमेलन 1 ते 3 मे दरम्यान नगरला होणार आहे, त्याची माहिती देण्यासाठी ते व मध्यवर्ती नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ते परत निघण्यासाठी गाडीजवळ पोहोचले असता त्यांच्या गाडीची काच फोडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथे अनेक गाड्या असताना केवळ पोंक्षे यांच्याच गाडीची काच फोडण्याच्या कारणाबाबत चर्चा सुरू आहे. पोंक्षे यांच्याशी असलेल्या वैचारिक विरोधातून त्या रागातून कोणी असे कृत्य केले काय अशी चर्चा सध्या रंगली आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.नगरच्या मनमाड मार्गावरील श्रद्धा हॉटेल समोर साडेबारा- एकच्या सुमारास घटना घडली, या नंतर पोंक्षे दुसऱ्या गाडीने निघून गेले. तर दुरुस्टीसाठी नेण्यात आली आहे.