विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मानस
जळगाव (प्रतिनिधी) :- रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५-२६ वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यात कल्पेश छेडा यांची अध्यक्षपदी, तर पूजा अजय अग्रवाल यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे क्लबच्या सामाजिक उपक्रमांना नवीन दिशा मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.
नवनियुक्त अध्यक्ष कल्पेश छेडा आणि सचिव पूजा अग्रवाल यांनी यापूर्वी क्लबमध्ये विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रोटरी ईस्ट नवीन उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडीनंतर बोलताना अध्यक्ष कल्पेश छेडा म्हणाले, “रोटरीच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रात आम्ही अधिक प्रभावीपणे काम करू.” त्यांनी येत्या काळात रोटरी ईस्टच्या विविध सामाजिक प्रकल्पांना गती देण्यासाठी विशेष योजना आखण्याचे संकेत दिले.
यात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे एटीएम, स्मशानभूमींची विकासकामे, स्वच्छतागृहे, आरोग्य शिबिरे, हॅपी स्कूलद्वारे शैक्षणिक कार्य अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. रोटरी ३०३० चे प्रांतपाल नाना शेवाले आणि असिस्टंट गव्हर्नर अपर्णा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारिणी कार्यरत राहील. या कार्यकारिणीमध्ये संजय गांधी, प्रमोद संचेती, वर्धमान भंडारी, डॉ. मनोज चौधरी, प्रदीप देशमुख, मितेश शाह, सुनील शाह, प्रदीप कोठारी, संजय शाह, अभय कांकरिया, विनोद पाटील, पीयूष सांघवी, पूर्वेश शाह, डॉ. राहुल भंसाली, प्रीतम मुनोत, रजनीश लाहोटी, जिज्ञासा पाटील, डॉ. मयुरी पवार, प्रणव महेता, डॉ. जगमोहन छाबडा, विक्रम मुनोत, प्रीतिश चोरडिया, संग्रामसिंह सूर्यवंशी या प्रमुख सदस्यांचा समावेश आहे.