जळगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – उधारीवर विकलेल्या शिलाई मशिनचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन पौर्णिमा अशोक गरुड (वय ३०, रा. डोंबिवली, ह. मु. लक्ष्मीनगर) यांना चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करुन तिच्या भाचीच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. ही घटना दि. २० रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पौर्णिमा गरुड यांनी उधारीवर शिलाई मशिनची विक्री केली होती. त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने राजनंदीनी सोनवणे, चेतना अहिरे, सखुबाई सोनवणे, प्रशांत सोनवणे हे दि. २० रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी पौर्णिमा गरुड यांच्यासह तीचे पाहुणे व भाची यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करीत जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.