चाळीसगाव तालुक्यात न्यायडोंगरी परिसरातील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील न्यायडोंगरी रेल्वे तांडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी हृदयद्रावक घटना घडली. तरुण शेतातून काम करून घरी परतत असताना रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रमेश शिवाजी पवार (वय ३४) असे मयत तरुणाचे नाव आहे. रमेश पवार मजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, वृद्ध वडील असा परिवार आहे. ते आपल्या भावाच्या शेतातून घरी परतताना सायंकाळी ४.४५ वाजता धावत्या रेल्वेखाली आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.