रावेर पोलीस स्टेशनची कामगिरी
रावेर (प्रतिनिधी) :- येथील नागझिरा परिसरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एकास अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
येथील नागझिरी परिसरात शेख अकील शेख कलीम यांची हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १९ सीएस ०३९२) ही रावेर-रसलपूर रोडवरील हॉटेल एसटूसमोरुन चोरीस गेली होती. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास सुरू असताना गुप्त माहितीवरून सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण करुन व शोध घेऊन संशयित सुशिल सुधाकर तायडे (रा.रसलपूर ता. रावेर) यास अटक करण्यात आली. संशयिताची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून शेख अकील यांची चोरीस गेलेली मोटार सायकल व हिरो होंडा काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल (एमपी ६८ एमई ५९५४) या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आली. त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून हा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. सिकंदर तडवी, कल्पेश आमोदकर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकारुद्दीन शेख यांच्या पथकाने कार्यवाही केली. पुढील तपास पोहेकॉ. सिकंदर तडवी हे करीत आहे.