जळगाव ;- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदीच्या काळात ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करता आले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी दि.०८ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
माहे मार्च/एप्रिल/मे-२०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज विद्यापीठास सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून ई-मेल द्वारे किंवा इतर ऑनलाईन पध्दतीने कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क व विलंब शुल्क न आकारता मागविण्यात यावेत. यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ई-मेल व संपर्क क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत. ज्या विद्यार्थ्याचे परीक्षा अर्ज डीयु पोर्टलवर जनरेट आहेत, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज सर्व दस्ताऐवजासह स्कॅन करुन विद्यापीठाच्या sfc@nmuj.digitaluniversity.ac या ई-मेल वर ८ जून२०२० पर्यंत पाठवावे, असेपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी कळविले आहे.