जळगावात गोलाणी मार्केट येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गोलाणी मार्केट येथे चष्मा चोरी केल्याची शंका घेवून भाजीपाला विक्री करणाऱ्या तरूणाला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी ९ जून रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश संजय चौधरी (वय २५ रा. कांचन नगर, जळगाव) हा तरूण त्याच्या मित्रासोबत सोमवारी ९ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील फेमस मोबाईल दुकानासमोर आला होता. जावेद यांचे चष्म्याच्या दुकानातून चष्मा डोळ्यावर लावून फोनवर बोलत असतांना बाजूला झाले. त्यावेळी दुकानातील जावेद, शहबाज, बशीर आणि तन्वीर (पुर्ण नाव माहिती नाही) यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी दिनेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ हे करीत आहे