जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर जवळ घडली घटना
खासगी आराम बस प्रवाशांना घेऊन सुरतहून मेहकरकडे निघाली होती. बुधवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास मुक्ताईनगरजवळ सदरची बस महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. अपघातात बसमधील देविलाल पन्नालाल आणि अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय २४ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याला सुरुवात केली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अपघातातील जखमींमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लता देवघामे (४९), शालीग्राम देवघामे (६०), ऋषिकेश देवघामे (३०, रा.वरवंड), जयसिंग शिरसाठ (७०), राधाबाई शिरसाठ (६०), आनंदा शिरसाठ (२४, रा. दादुलगव्हाण), गजमल आढाव (४२), वर्षा आढाव (४२, रा. लासुरा), मोहंमद अफरोज (३९), कैलास गुजर (५२, रा. रोहिणखेड), सलीमा शेख (४५), सानिया शेख (१९, रा. ढोणगाव), जयश्री मोरे (२०, रा.बंडारी सोदखेड), रामेश्वर काळे (४२, रा.शेणगाव हिंगोली), अनुमुद्रा काळे (२८), अष्टविनायक काळे (आठ, रा. काहकर), आवेश शहा (१६), जैगून शहा (६०, रा. मोताळा), बब्बू शहा (५७, रा, बुलढाणा), गोविंदा गुंड (३०,रा. चिखली), उषाबाई तायडे (५९, रा. रूईखेड मायंबा), उदय शेळके (४१, रा. सारोळा) आणि फिरोज शेख (४२), शबाना शेख (३६, रा. सुरत) यांचा समावेश आहे.