पारोळा तालुक्यातील राजवड येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील राजवड येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.३ जून रोजी उघडकीस आली. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजवड येथील राजेंद्र भावराव बाविस्कर पाटील (वय ५२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.दिनांक ३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजवड ढेकू रस्त्यावरील स्वतःच्या शेतात पत्री शेडमध्ये नॉयलॉन दोरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्यावर हात उसणवारीचे व सोसायटीचे कर्ज असल्याने ते सतत नैराश्यात होते त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.