जळगाव शहरातील पिंप्राळा भागात झाली घरफोडी !
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा भागात बंद घर पाहून चोरटयांनी संधी साधली दागदागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे. कुटुंबीय मुलीकडे ऑस्ट्रेलीया देशात गेले आहे. घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्यामुळे हि घटना घरमालकाला उघड झाली. याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र दौलतराव वाघे (रा. मारोती पार्क, पिंप्राळा शिवार, जळगाव) हे त्यांच्या पत्नीसह मुलीकडे ऑस्ट्रेलिया या देशात गेले आहेत. त्यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.(केसीएन)दरम्यान, दि. १ जून रविवारी रोजी सकाळी ९ वाजता नरेंद्र वाघे यांनी त्यांचे पाहुणे लीलाधर शांताराम खंबायत (वय ५१, रा. पार्वती काळे नगर, जळगाव) यांना फोन करून सांगितले कि, घराचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. तुम्ही घरी जाऊन पहा. त्यानुसार लिलाधर खंबायत यांनी घरी जाऊन पाहिले असता वाघे यांच्या घराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. सीसीटीव्ही कॅमेरांचा डीव्हीआर काढून नेलेला असल्याने दिसून आला नाही.
घरात तपासले असता सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यानुसार लीलाधर खंबायत यांनी साडू नरेंद्र वाघे यांना घरफोडी झाल्याची माहिती दिली. घरातील सोन्याची चैन व अंगठ्या असा सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेलेला दिसून आला आहे. त्यानुसार लीलाधर खंबायत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि संदीप वाघ हे करीत आहेत.