जळगाव ( प्रतिनिधी ) –जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील दीपक जगदेव पाटील (३४) यांचा मृतदेह नशिराबादनजीक एका विहिरीत तरंगताना आढळला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नशिराबाद शिवारात एका विहिरीमध्ये पुरुषाचा मृतदेह तरगंत असल्याची वार्ता गावात पसरली. नशिराबाद पोलिसांनी जाऊन खात्री केली व मृतदेह बाहेर काढला. त्या वेळी हा मृतदेह गाडेगाव येथील दीपक पाटील यांचा असल्याची ओळख पटली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.