कृषि विभागामार्फत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया मध्ये खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत सोयाबीन पिकांचे अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत. याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे.
यासाठी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या मथळ्या अंतर्गत बियाणे घटकामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या घटकासाठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा व तरी जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.