जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मानसिक आरोग्य विभागाने मानसिक आरोग्य शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले यातून चित्रफित व संभाषणातून जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या (मानसोपचार वॉर्ड) येथे हा कार्यक्रम आयोजित केला. प्राचार्य विशाखा गणवीर प्राचार्य जीसीओएन जळगाव, प्रा. जसिंथ धाया उपप्राचार्य, प्रा. अश्वीनी वैद्य मानसोपचार विभाग, जीसीओएन, जळगावच्या प्रमुख श्रीमती हेमांगी मुरकुटे सहयोगी प्राध्यापक, श्री. सुमित निर्मल सहाय्यक प्राध्यापक, श्रीमती मालती सहयोगी प्राध्यापक, श्री. गिरीश खडसे एमएससी. ट्यूटर आणि मानसोपचार स्पेशॅलिटीचे पीजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. पीजीच्या विद्यार्थिनी मयुरी तिमांडे आणि रोहिणी हारगे यांनी स्किझोफ्रेनिया, लक्षणे आणि उपचारांबद्दल माहिती देतांना जागतिक स्किझोफ्रेनिया दिन २४ मे रोजी साजरा केला जातो, जो मानसिक आजारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि स्किझोफ्रेनिया या गुंतागुंतीच्या मानसिक आजाराविषयी समाजात समज, सहानुभूती आणि समर्थन वाढवण्यासाठी समर्पित आहे .स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या विचारसरणी, भावनांवर नियंत्रण आणि वास्तवाच्या जाणिवेवर परिणाम होतो. याचे लक्षणे विविध प्रकारची असू शकतात, ज्यात भ्रम, भास, असंगत विचारसरणी आणि सामाजिक अलगाव यांचा समावेश होतो या आजाराविषयी समाजात अनेक गैरसमजुती आणि कलंक आहेत. या दिवसाच्या निमित्ताने, या गैरसमजुती दूर करून, रुग्णांना आवश्यक ते समर्थन आणि सहानुभूती मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगीतले.