जननायक थिएटर गृप, भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनचे आयोजन
जळगाव ( प्रतिनिधी ) – जननायक थिएटर गृप, जी.एम. फाउंडेशन, भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन तसेच आमदार सुरेश भोळे (राजुमामा) सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात सुरू असलेल्या विनामूल्य बालनाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, शिबिरार्थी व पालकांच्या आग्रहास्तव हे शिबिर आता २० दिवसांऐवजी ३० दिवसांचे करण्यात आले आहे.


व्यवस्थापक तेजस पाठक व अक्षय कुमावत यांनी रंगमंचावरील प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था, माईक ऑपरेशन, पार्श्वसंगीत, प्रोजेक्टर व नेपथ्य बदलाचे तांत्रिक पैलू समजावून सांगितले. याचबरोबर विद्यार्थ्यांना नाट्यगृहाच्या मागील भागातील ग्रीन रूम, मेकअप रूम, वॉर्डरोब सेक्शन, लाईट कंट्रोल रूम आणि ध्वनी नियंत्रण विभाग यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून घेण्यात आले.या शिबिरातून शिबिरार्थ्यांमध्ये कलात्मक आत्मविश्वास, सृजनशीलता, संवाद कौशल्य आणि सामाजिक जाण निर्माण होत असून, भविष्यातील दर्जेदार कलाकार घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मोलाचा ठरत आहे. नाट्यकलेप्रती बालवयातच आकर्षण निर्माण करून संस्कृतीशी नाते घट्ट करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.