पारोळा तालुक्यात हनुमंतखेडा फाट्यानजीक घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हनुमंतखेडा फाट्यानजिक एका दुचाकीने पुढे चालणाऱ्या दुचाकीला मागाहून धडक दिल्याने त्यात ४ जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी दि. १६ रोजी दुपारी एक वाजता घडली. पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सिद्धेश सुदाम राठोड (१९ वर्ष), काजल सुदाम राठोड (१५ वर्ष, रा. जोगलखेडे तांडा ता. पारोळा) हे दोघे बहीण भाऊ एका मोटारसायकलने आडगाववरून जोगलखेडे येथे येत जात होते. पुढे दुसऱ्या दुचाकीवर जाणारे वृद्ध दाम्पत्य सुशीलाबाई बाबाजी शेलार (६५ वर्ष), बाबाजी खंडेराव पाटील (वय ७० वर्ष, रा. आडगाव) हे दोघे त्यांच्या मोटारसायकलने हनुमंतखेडे फाट्यानजिकच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वळत असतांना सिद्धेशच्या दुचाकींचा अपघात झाला. त्यात वरील चारही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.