संवाद मेळावा : मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरले नवचैतन्य
जळगाव ( प्रतिनिधी ) – “ना झुके हैं, ना बिके हैं, ना टूटे हैं, हम बाळासाहेब के चेले हैं, खुलकर लड़े हैं और खुलकर जिए हैं” जोशपूर्ण शायरीने सुरुवात करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या संवाद मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मेळाव्याच्या सुरुवातीस शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जनतेच्या हृदयाशी जोडलेली आहे. शिवसेना म्हणजे चळवळ, शिवसेना म्हणजे जनतेच्या मनातील ताकद. असे म्हणत त्यांनी उपस्थितांना आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणीकडे असलेल्या उदासीनतेवर त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी बोलताना सांगितले की, गुलाबभाऊंनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासासाठी झटत नेतृत्व केलं. शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकत्र्यांनी अहोरात्र मेहनत घ्यावी. तसेच मुंबईप्रमाणे जळगाव ग्रामीणमध्येही लवकरच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा प्रमुख संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील युवा नेतृत्त्व आकाश अनिल सोनवणे, रवींद्र पवार, अनिल राठोड, पंकज चव्हाण, ओम पवार, शुभम सोनवणे, दादू जाधव यांच्यासह वकील संघटनेचे अॅड. आशिष पाटील, धीरज पाडे, सावता माळी, प्रवीण येवले, उमेश सनसे, भावेश सोनवणे, पंकज सवर्णे, कोमल काळे, पवन सोनी, चांगदेव दांडगे, हर्षल संत, राजेश हरणे, श्याम शिंदे, रवींद्र रडे या सर्व वकील मंडळींनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
मेळाव्यास जिल्हाप्रमुख युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले, तालुका प्रमूख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, पवन सोनवणे, उप जिल्हा प्रमूख रवींद्र कापडणे, महानगर प्रमूख संतोष पाटील, शहर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन ढाके, अनिल भोळे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सपकाळे, राजू पाटील, डॉ. कमलाकर पाटील, धोंडू जगताप, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजय महाजन, रामकृष्ण काटोले, उपतालुका प्रमूख जितू पाटील, प्रमोद सोनवणे, प्रविण परदेशी, राजू पाटील कैलास चौधरी, समाधान चिंचोरे, महिला आघाडीच्या शितलताई चींचोरे, ललिता कोळी, ज्योती शिवदे, ज्योती चव्हाण, मुरलीधर पाटील, गोपाल जीभाऊ, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे, जितू गवळी, लाडकी बहिण अध्यक्ष अर्जुन पाटील, सुरेश भापसे, पि.के. पाटील, ब्रिजलाल पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले तर आभार उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे यांनी मानले.