जळगाव तालुक्यातील वावडदा येथे विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे अभिनंदन
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा सलग ११ व्या वर्षी १००% निकाल लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली (सीबीएसई) अंतर्गत इयत्ता १०वी परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. या वर्षासाठी इयत्ता १० वीला ४७ विद्यार्थी प्रविष्ट होते. सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यापैकी पाच विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले.
शाळेचे अध्यक्ष एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील, वैशाली पाटील, कुणाल राजपूत, दिव्यानी राजपूत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील व पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजिता साळुंखे, वर्गशिक्षक योगेश चव्हाण, दीपक सराफ, अन्वेषा माहेश्वरी, परीस यादव, मोहसिना पटेल व वृषाली चौधरी इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तसेच सर्व पालकांचे देखील अनमोल सहकार्य लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनातर्फे अभिनंदन करण्यात आले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी
प्रणव सूर्यवंशी पहिला ९४.२
यशस्वी पाटील दुसरी ८९.०
मीनल पाटील तिसरी ८८.०
नयन पवार तिसरा ८८.०
मोक्ष गवळी चौथा ८६.४
वेदांत पाटील चौथा ८६.४
सोहम हिडे पाचवा ८५.०