विद्यार्थी सागर अस्वार विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
शिरसोली (वार्ताहर) : येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९५ टक्के लागला असून शाळेतून सागर विजय अस्वार याने ९३.८०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

द्वितीय क्रमांक समर्थ किरण पाटील ९२.४०% व तृतीय क्रमांक मयुरी प्रवीण बारी ९२% या विद्यार्थिनीने पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष अशोक तोताराम अस्वार, सचिव सुरेश पुंडलिक आस्वार, शालेय समिती चेअरमन कमलाकर तांदळे, उपाध्यक्ष दिलीप रामदास बारी, संचालक निलेश खलसे, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व पर्यवेक्षक आर.के. पाटील यांनी कौतुक केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









