जळगांव : गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील यंत्र व विद्युत विभागातर्फे दिनांक ६ मे ते १० मे २०२५ दरम्यान बेसिक पीएलसी व ड्रोन टेक्नोलॉजी या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल व आयक्यूएसी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.पीएलसी ऑटोमेशन (६ मे ते ७ मे)या कार्यशाळेच्या पहिल्या दोन दिवसांत पीएलसी ऑटोमेशनवर विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव या नामांकित संस्थेचे श्री. निलेश वाघ हे प्रमुख मार्गदर्शक होते.पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी पीएलसीची बेसिक माहिती घेतली, रिले कसे कार्य करतात हे प्रत्यक्ष पाहिले आणि पीएलसी चे प्रत्यक्ष हाताळणीचे प्रात्यक्षिक केले.दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांनी पुश बटन स्विचेस पीएलसी ला जोडून प्रत्यक्ष सर्किट तयार केले. त्यानंतर मोटर कंट्रोलिंग सिस्टीम बनवून कार्यान्वित केली.या कार्यशाळेत इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना औद्योगिक ऑटोमेशनमधील अद्ययावत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळाला. ड्रोन टेक्नोलॉजी सेशन्स (८ मे ते १० मे)कार्यशाळेच्या उर्वरित तीन दिवसांत विद्यार्थ्यांना ड्रोन टेक्नोलॉजी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथील थर्ड क्सिस ड्रोन क्लब चे तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ आणि स्पर्धात्मक यश संपादन केलेले विद्यार्थी प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.या पुरस्कारप्राप्त व नावाजलेल्या टीमचे सदस्य आदित्य बडगुजर (कॅप्टन, संशोधन व विकास प्रमुख), अनुज टाकोटे (उपकर्णधार, डिझाईन व विश्लेषण प्रमुख), प्रांजल सोनवणे (एव्हिऑनिक्स प्रमुख),कौशल राऊत (मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग प्रमुख)या टीमने विद्यार्थ्यांना ड्रोनचे असेंब्ली, फ्लाइट कंट्रोल, सॉफ्टवेअर व वायरलेस कंट्रोलिंग, आणि प्रत्यक्ष उड्डाण यावर सखोल मार्गदर्शन दिले. प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना ड्रोनशी संबंधित अनेक तांत्रिक बाबींचा थेट अनुभव घेता आला.कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील थर्ड क्सिस ड्रोन लॅब या ठिकाणी अभ्यास दौरा या माध्यमातून भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षरीत्या विविध प्रकारचे ड्रोन्स त्याशी संबंधित असलेले पार्ट्स तसेच त्याला लागणारे सॉफ्टवेअर, अत्याधुनिक थ्रीडी प्रिंटिंग मशीन याबद्दल अधिक माहिती घेतली.कार्यशाळेचा उद्देश व यशया पाच दिवसांच्या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण नव्हे तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व हँड्स-ऑन अनुभव मिळविण्याची संधी मिळाली. ही कार्यशाळा त्यांना उद्योगजगतातील अत्यावश्यक कौशल्यांची ओळख करून देणारी ठरली.ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. अमित म्हसकर, प्रा. सचिन महेश्री व प्रा. किशोर महाजन तसेच विद्युत विभाग प्रमुख प्रा. महेश पाटील, यंत्र विभाग प्रमुख प्रा. तुषार कोळी यांनी प्रा. प्रवीण फालक (उपप्राचार्य) डॉ. विजयकुमार पाटील(प्राचार्य) त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रुती सोनार, तरन्नुम पिंजारी, हर्षा धांडे व गायत्री गोंड या विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग आणि तांत्रिक उत्कंठा यामुळे ही कार्यशाळा अतिशय यशस्वी ठरली.