डाएट प्राचार्य अनिल झोपे यांच्या हस्ते सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या वतीने राज्यातील शिक्षकांमध्ये ई लर्निग शैक्षणिक साहित्य निर्मीती चळवळ उभी रहावी या साठी राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या करिता राज्यस्तर दर्जेदार
शैक्षणिक व्हिडीओ निर्मीतीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विदया प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विदयालय, शारदा कॉलनी, जळगाव येथील उपशिक्षक अमोल काशिनाथ बाविस्कर यांना इयत्ता६ वी ते ८ वी या गटामध्ये इंग्रजी या विषयात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबददल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
जळगाव (डायट) चे प्राचार्य अनिल झोपे यांनी प्रमाणपत्र, ट्राफी, गुलाबपुष्प, पेन, रोख ३ हजार रुपये देवून सन्मानीत केले. पुरस्काराबददल संस्थेचे सचिव चारुशिला इंगळे, उपाध्यक्ष सुरेश नारखेडे, संचालक नितीन इंगळे, मुरलीधर पाटील तसेच विदयालयाचे मुख्याध्यापक विजय गिरनारे ,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.