जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेंदुर्णी येथील लक्ष्मण दौलत गुजर व मालनबाई लक्ष्मण गुजर यांच्या मालकीच्या शेतात दि ३० रोजी दुपारी विजेच्या तारेचा शॉर्ट सर्किट होऊन ५ एकरातील पिक जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
यात काढणीसाठी आलेला मका आणि ज्वारी पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालेली आहे. तसेच शेतकऱ्याने केलेल्या नवीन ठिबक तसेच पाईप हे सुद्धा जळून पूर्णपणे खाक झाले. यात शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले असून तलाठी योगेश ब्राह्मणे यांनी सदर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यात ६० आर मका व ४० आर ज्वारी असे पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.