जळगाव शहरात नवीन बस स्थानकाजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातून जळगाव शहरात कामानिमित्त आलेल्या वृद्ध व्यक्तीचा शहरातील नवीन बस स्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवार दि. २ मे रोजी सकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (वय ७०, रा. मंचर ता. आंबेगाव जिल्हा पुणे) असे मयत इसमाचे नाव आहे. परिवारासह ते राहत होते. मोहम्मद शफी है रबरी शिक्के बनवून देण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. तर त्यांचा मुलगा वकिली काम करून उदरनिर्वाह करतो.(केसीएन)दरम्यान दि.२८ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयमध्ये रबरी शिक्के तयार करून ते जळगाव येथे आले होते. रबरी शिक्के दिल्यानंतर मात्र ते बेपत्ता झाले होते. त्यानुसार जळगाव शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
त्यानुसार मोहम्मद शफी यांचा शोध सुरू होता. दरम्यान शुक्रवारी दि.२ मे रोजी सकाळी नवीन बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये एका खोलीमध्ये मोहम्मद शफी यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.(केसीएन)सदर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये मोहम्मद शफी यांच्या मुलाने आक्रोश केला. दरम्यान घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.