मुंबई (वृत्तसंस्था) – अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत असून, बुधवार दुपारी ते अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात परिसरात ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जाहीर केली आहे. भारतीय नौसेना, भारतीय तटरक्षक दल व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाची सोशल मीडियातही चांगलीच चर्चा सुरु आहे.
सध्या मुंबईत कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात आहे. त्यात जून महिन्यामध्येच वादळाचा तडाखा बसण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे एकीकडे या वादळासंदर्भात भीती असली तरी दुसरीकडे सोशल मीडियामध्ये निसर्ग चक्रीवादळा संदर्भातील मिम्सही व्हायरल झाले आहेत. तर पाहूया असेच काही व्हायरल झालेले मिम्स..







