गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे मलेरिया दिनानिमीत्त जनजागृती
जळगाव – जागतिक मलेरिया दिनानिमीत्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे नशिराबाद येथे रॅली काढून मलेरिया प्रतिबंधासाठी उपाय करा, हिवतापाला दूर करा असा संदेश देत जनजागृती करण्यात आली.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक मलेरिया दिनानिमीत्त नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांनी रॅली काढून मलेरिया आजाराबाबत जनजागृती केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रूग्णांना आरोग्यविषयक माहिती दिली. उपस्थितांसह प्रतिज्ञाही घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, उपप्राचार्य जेसिंथ दहिया, प्रा. निर्भय मोहोड, प्रा. स्वाती गाडेगोने, प्रा. अश्लेषा मून, प्रा. रितेश पडघान, प्रा. डिव्हायना पवार, प्राजक्ता आराक, सुमित भारंबे आदी उपस्थित होते. रॅलीत बीएससी पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.