दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल
मलकापूर (प्रतिनिधी) : मुलाला चांगले मार्क देवून पहिला नंबर आणू. यासाठी आम्हाला खुश कर असे म्हणत जबरदस्तीने शारिरीक संभोग करून वारंवार शरीरसुखाची मागणी केली. तसेच मुलाला व महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून २२ एप्रिल रोजी मलकापूर शहर पोलिस स्टेशनला नूतन विद्यालयातील दोन शिक्षकांविरूध्द मलकापूर शहर पो. स्टे.ला बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपी शिक्षकांना अटक केली आहे.
पीडित महिलेने मलकापूर शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी समाधान इंगळे (वय ४५ वर्ष, रा. मधुबन नगर, मलकापूर) व अनिल थाटे (वय ४७ वर्ष, रा. यशोधाम नगर, मलकापूर) या दोघांनी, तुझे मुलाला आम्ही चांगले मार्क मिळवून देवू, शाळेतून त्याचा पहिला नंबर आणू. त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल. असे म्हणून जबरदस्ती शारीरीक संभोग केले.केसीएन)तसेच वारंवार शरीरसुखाची मागणी केली. महिलेने शारीरीक संभोग करण्यास नाही म्हटले असता तुला व तुझे मुलाला जिवानिशी मारुन टाकू अशी धमकी दिली. सदर प्रकार हा १० सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ चे पूर्वी घडला आहे. सदर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कौळासे करीत आहेत.