५० टक्के महिला बनतील सरपंच
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीपैकी ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत दि. २१ एप्रिल रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता तहसिलदार कार्यालयामध्ये काढण्यात आली. दोन सत्रात जाहिर करण्यात आलेल्या आरक्षणात ५० टक्के जागेवर महिलांना संधी देण्यात आली आहे.
तालुक्यात एकुण ६७ ग्रामपंचायती आहेत. यातील ४ ग्रामपंचायतीचे आरक्षण यापुर्वीच जाहिर झालेले आहे. तर उर्वरित ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोमवारी दिनांक २१ एप्रिल रोजी येथील तहसिल कार्यालयात दोन सत्रात जाहिर करण्यात आले. सकाळच्या सत्रात तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांनी एकुण ६३ ग्रामपंचायतीत अनुसुचित जातीसाठी ८ सरपंचपद, अनुसूचित जमातीसाठी २१ सरपंचपद, मागास प्रवर्गासाठी २ सरपंचपद आणी सर्वसाधारण करीता आणि ३२ सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहिर केले तर दुपारी २ वाजे पासुन प्रांताधिकारी बबन काकडे यांनी या सर्व ६३ ग्रामपंचायतीत विविध प्रवर्गा सह एकुण महिलांसाठीच्या ३३ जागेवरील आरक्षण जाहिर केले. सदर प्रक्रीये करीता निवासी नायब तहसिलदार संतोष विनंते, नायब तहसिलदार अतुल गांगुड, सुयोग पाटील यांनी कामकाज पाहिले. तर विविध आरक्षण संर्दभातीलईश्वरचिट्ठी इश्वरिय धांडे रा. किनगाव, दिव्या वाघुळदे व रिया वाघुळदे रा. मालोद या बालीकेच्या हाताने काढण्यात आल्या.
असे आहे आरक्षण
अनुसुचित जमाती राखीव : भालशिव, मोहराळे, सावखेडासिम, किनगाव बुद्रुक, पिळोद खुर्द, पाडळसे, सांगवी खुर्द, थोरगव्हाण, बोराळे, राजोरा
अनुसुचित जमाती महिला राखीव : बोरावल बुद्रुक, वढोदे प्र. यावल, बोरखेडा बुद्रुक, वड्री खुर्द, मनवेल, कोसगाव, मारूळ, बोरावल खुर्द, बामणोद, विरोदे चिखली बुद्रुक,
अनुसुचित जाती राखीव : पिंप्री, हंबर्डी, पिंपरूड, नावरे अनुसुचित जाती महिला राखीव : सांगवी बुद्रुक, अट्रावल, कोळवद, म्हैसवाडी.
नामाप्र :- चिखली खुर्द, नामाप्र महिला राखीव :- वढोदे प्र. सावदा.
सर्वसाधारण : डांभुर्णी, चिंचोली, विरावली बुद्रुक, किनगाव खुर्द, आमोदे, निमगाव, हिंगोणे, सातोद, महेलखेडी, पिळोदे बुद्रुक, चितोडा, टाकरखेडा, वनोली, कासारखेडे, नायगाव, शिरागड.
सर्वसाधारण महिला राखीव : कोळन्हावी, चुंचाळे, कासवे, आडगाव, गिरडगाव, शिरसाड, दुसखेडा, कोरपावली, अंजाळे, डोंगरकठोरा, उंटावद, साकळी, न्हावी, भालोद, दहिगाव, डोणगाव.