बी.एससी. नर्सिंग हिवाळी ५ वे सेमिस्टरचा ९८.५७% निकाल
जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या बी.एससी. नर्सिंग हिवाळी ५ व्या सेमिस्टरच्या निकालात गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गौरव मिळविला आहे.
महत्वाचे म्हणजे निकाल ९८.५७% लागला असून, महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ठळक छाप उमटवली आहे. बीएस्सी नर्सिंग ५ वे सेमिस्टर यशस्वी विद्यार्थी: प्रथम: आकांशा काळे- ७६.५७%, द्वितीय: आचल मिल्के – ७४.५७%,तृतीय: कल्याणी शहाणे- ७४% तर रूतूजा शेंडे,तेजल हिवराळे,आचल मेश्राम यांनी ७३.७१% मिळवत सयुक्तपणे ४थे तर गायत्री सुरोेशे ७२% पाचवी आली.या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव सौ. वर्षा पाटील, संचालक डॉ. केतकी पाटील व डॉ. वैभव पाटील, प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, उपप्राचार्य प्रा. जस्मित दया, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रवीण कोल्हे आणि सर्व शिक्षकवृंद, टीचिंग व नॉन-टीचिंग स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीसह शिक्षकांचे मार्गदर्शन, तसेच संस्थेच्या नियोजनशील व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाले आहे. संस्थेच्या वतीने भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.